
एरंडोल : – छत्रपती फुले शाहू आंबेडकर नगर गांधीपुरा एरंडोल , माता रमाबाई आंबेडकर बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे माता रमाबाई आंबेडकर यांच्या 87 व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माननीय प्रा. नरेंद्र गायकवाड सर प्रा. उमेश सूर्यवंशी, तसेच शंकर खैरनार, प्रवीण खैरनार, आनंद संदांशिव , जितेंद्र बोडरे, ब्लू बॉईज ग्रुप एरंडोल ,माता रमाबाई आंबेडकर नगर गांधीपुरा, येथील स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात समाज बांधव या अभिवादना च्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी प्रा. नरेंद्रजी गायकवाड यांनी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन संघर्ष व बाबासाहेब यांच्या जीवनातील रमाई चे स्थान याविषयी मार्गदर्शन केले. माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अभिवादन हे स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले.





