
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- विखरण तालुका एरंडोल येथील 15 वर्ष 9 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीस युवकाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला दिली आहे.
याबाबत माहिती अशी की विखरण येथील शेतमजूर कुटुंबातील 15 वर्ष 9 महिने वय असलेल्या मुलीस गावातील युवकाने फूस लावून पळवून नेले अल्पवयीन मुलीच्या परिवारातील सदस्यानी काल दि 27 मे रोजी रात्री सोबत जेवण केले. जेवण झाल्यावर अल्पवयीन मुलगी प्रात विधीसाठी जाते असे सांगून घरातून गेली बराच वेळ झाला तरी मुलगी आली नाही म्हणून तिचे वडील, आई व परिवारातील सदस्यांनी तिच्या गावात व परिसरात शोध घेतला असता ती आढळून आली नाही.
मुलीच्या शोध घेत असताना गावातील रोहित वामन भिल हा युवक देखील गावातून गायब झाला असल्याचे मुलीच्या वडिलांना समजले अल्पवयीन मुलीला रोहीत भिल यानेच मुलीस फूस लावून पळवून नेल्याच्या संशय आल्याने मुलीच्या वडिलांनी त्याच्या विरोधात एरंडोल पोलीस स्थानकात तक्रार दिली अल्पवयीन मुलीचा रंग सावळा असून उंची पाच फूट आहे तिने चॉकलेटी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून काळ्या रंगाची लेगीज घातली आहे.
रोहित वामन भिल याचे विरोधात भा द वि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार महेंद्र पाटील, काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहे





