कांद्याचा दरात घसरण,कपाशीचे कमी झालेले उत्पन्न
कर्ज कसे फेडायचे यामुळे युवा शेतकऱ्यांची आत्महत्या

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :-
रिंगणगाव ता एरंडोल येथील 41 वर्षी युवा शेतकऱ्याने सततची नापिकी, कापसाचे कमी झालेले उत्पादन, कांद्याचा दरात झालेली घसरणामुळे आर्थिक नुकसान मुळे बँकांचे व खाजगी कर्ज कसे फेडायचे या कारणावरून विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली.

याबाबत माहिती अशी की रिंगणगाव येथील संजय अर्जुन पाटील वय 41 वर्षे या युगाकडे सुमारे चार एकर बागायती व कोरडवाहू शेती होती मागील वर्षी कापसाचे अपेक्षित उत्पन्न न झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या संजय पाटील यांनी कांद्याची लागवड केली होती. मात्र सद्यस्थितीत कांद्याच्या दरात देखील घसरण झाल्यामुळे बँकेचे व खाजगी कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत संजय पाटील होते.

शुक्रवार दिनांक 27 मे रोजी संजय पाटील यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मी बाहेर जाऊन येतो असे परिवारातील सदस्यांना सांगितले संजय पाटील रात्रभर घरी आले नाही म्हणून भाऊ विजय पाटील काल पासून भाऊ घरी आला नसल्याने काका नामदेव तुकाराम पाटील यांना सांगितले नामदेव पाटील विजय पाटील यांनी संजय पाटील यांच्या शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही

गावाजवळील परिसरातील शेतामध्ये शोध घेत असताना दिलीप भगवान नेवे यांच्या शेतातील विहिरीजवळ बूट आढळल्याने ग्रामस्थांच्या मदतीने गावातून बिलाई आणून विहिरीत टाकली असता बिलाईत शर्ट अटकला ग्रामस्थांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले असता ते संजय पाटील यांचे असल्याचे दिसून आले नामदेव तुकाराम पाटील यांचे तक्रारीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश पाटील पुढील तपास करीत आहेत

मयत संजय पाटील यांचे पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे त्यांच्याकडे चार एकर शेती असून त्याच्यावर बँकेचे कर्ज असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
फोटो ओळी:- मयत संजय पाटील

टीम झुंजार