शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य घरा घरा पर्यंत पोहचवा जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल :- तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसपर्क अभियान राबविण्यात आले याप्रसंगी खर्ची व तळई येथील आयोजित मेळावा प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत पदाधिकारी व शिवसैनिक यांना ना मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र राज्यांचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख मा उध्दव साहेब ठाकरे यांनी जनते साठी केलेले काम ते कर्जमुक्ती असो वा कोराना काळातील आरोग्य विषयी असो असे सर्व कामे लोकांपर्यंत पोहोचावे व संघटना वाढवावी असे मार्गदर्शन केले

या मेळाव्याचे अध्यक्ष शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले साहेब यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव नेता असल्यामुळे मी शेतकरी संघटनेचा काम करणारा माणूस त्यांच्या विचारावर प्रेरित होऊन शिवसेनेत आलो फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असे मला वाटते याच बरोबर भारतीय जनता पार्टी घाणेरडे राजकारण करत असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना बदनाम करण्याचे काम करतआहे

अशा प्रसंगी आपण शिवसैनिकांनी त्यांचा डाव हाणून पाडावा असे आवाहन देखील केले याप्रसंगी आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांनी मतदार संघात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना शिवसेना पक्ष प्रमुख मा उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळे विकास कामात आपण आघाडीवर असल्याचे मत व्यक्त केले या प्रसंगी प्रास्ताविकात एरंडोल संघटनेची माहिती देतांना आपल्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त संघटना वाढवु असे सांगितले यानंतर नानाभाऊ महाजन यांनी जिल्हा परिषद गटाचा आढावा मांडताना विकास कामांची माहिती दिली या बैठकीत जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनीदेखील मार्गदर्शन केले

याप्रसंगी मेळाव्याला जिल्हा बँकेचे संचालक अमोल दादा पाटील शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर जिल्हा परिषदेचे माउपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले युवा सेना तालुका प्रमुख बबलू पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख संजय पाटील रवींद्र चौधरी शिवसेना शहर प्रमुख कुणाल महाजन पंचायत समितीचे माजी सभापती रोकडे सर मोहन सोनवणे दादाजी पाटील दत्तू पाटील ओकार पाटील विभाग प्रमुख रवी जाधव विभाग प्रमुख देशमुख राठोड विभाग प्रमुख छोटू मराठे कासोदा शहर प्रमुख महेश पांडे युवा सेना तालुका समन्वयक कमलेश पाटील यांच्यासह बहुतांशी गावाचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन शिवसेनेचे शाखाप्रमुख शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते

टीम झुंजार