
झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
पुणे : ॲट्रॉसीटी कायदा बाबत ची कार्यशाळा “माणुसकी” संस्था ने २७ व २८ मे रोजी माणुसकी भवन येरवडा रोड पुणे येथे घेण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. अनिकेत खडसे मुंबई उच्च न्यायालय, ॲड. प्रभाकर सोनवणे पुणे जिल्हा सत्र न्यायालय, मंजुळा प्रदीप मानवी हक्क कार्यकर्त्या उपस्थित होते. या मध्ये राष्ट्रीय बहुजन संघ संघटना ला सहभागी करून घेतले होते.त्यानुसार राष्ट्रीय बहुजन संघ चे पदाधिकारी शरद शेळके व प्रविण बागुल आणि रितेश पवार तसेच दिपक निकम ॲट्रॉसीटी कार्यशाळा मध्ये उपस्थित होते.
सदर कार्यक्रम मध्ये सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त IAS आदरणीय डाॅ प्रशांत नारनवरे व बार्टी चे संचालक आदरणीय धम्मज्योती गजभिये साहेब यांनी मार्गदर्शन केले .
तसेच ॲट्रॉसिटी कायदा बाबत चे मार्गदर्शन ॲड.प्रभाकर सोनवणे साहेब यांनी उत्कृष्ठ केले .
ॲट्रॉसीटी व न्यायलयातील प्रक्रिया तसेच न्यायालयातील कायदेशीर प्रक्रिया बाबत मार्गदर्शन ॲड.अनिकेत खडसे साहेब यांनी केले.
ॲट्रॉसीटी कार्यशाळा मध्ये सामाजिक नेत्या माणुसकी संघटना च्या पदाधिकारी आदरणीय मंजुला प्रदिप यांनी देशा मधील विविध राज्य मधील अनुसूचित जाती आणि जमाती मध्ये जातीयवाद व केलेल्या कामाचा आलेख मांडला. वैभव धाईंजे यांनी केसमध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती कशाप्रकारे केली जाते याचे मार्गदर्शन केले.
ॲट्रॉसीटी कार्यशाळा चे सुत्रसंचालन माणूसकी चे प्रमुख मैत्रीनाथ यांनी शब्दांचा कोषातील शब्द काढून मंत्रमुग्धपणे सुत्रसंचालन केले .
ॲट्रॉसीटी कार्यशाळा बाबत सर्व व्यवस्थापन अत्यंत सुंदरपणे आदरणीय प्राची साळवे मॅडम ने केले .
महाराष्ट्र मधील विविध जिल्हा मध्ये ॲट्रॉसीटी बाबत काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय बहुजन संघ चे अध्यक्ष शरद शेळके यांनी माणुसकी संघटने तर्फे बार्टी चे संचालक आदरणीय धम्मज्योती गजभिये साहेब यांचे स्वागत केले .
यावेळी राष्ट्रीय बहुजन संघ सरचिटणीस प्रविण बागुल, रमाताई अहिरे, पी.एस.खंदारे,वैभव धाईंजे यांनी मार्गदर्शन केले.





