एरंडोल येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी अनेक मान्यवरानी केले अभिवादन

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल- येथील मौर्य क्रांती संघ,धनगर समाज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्यावतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

एरंडोल टेनिस क्लबच्या पटांगणावर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,जिल्हा परिषदेचे सदस्य नाना महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,डॉ.प्रविण वाघ,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,किशोर निंबाळकर,नायब तहसीलदार लक्ष्मण पारखे

शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,माजी सभापती अनिल महाजन, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,निवृत्त नायब तहसीलदार सुरेश पारखे यांच्याहस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास डॉ.प्रविण वाघ,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर,अजेंद्र पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य

एस.पी.पाटील,राजू धनगर,उद्योजक कृष्णा धनगर,वामन धनगर,डॉ.राहुल वाघ,नवल धनगर,कवी विलास मोरे,युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील,भाऊसाहेब न्हाळदे,दापोरीच्या सरपंच कल्याणी पाटील,नगरसेविका सारलाताई पाटील गुड्डू धनगर,बबलू पाटील,दिलीप धनगर,नाना मोरे,रवींद्र लाळगे,रवींद्र धनगर,सुरेश धनगर यांचेसह समाज बांधव आणि विविध राजकीय व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी मौर्य क्रांती संघ,धनगर समाज आणि उत्सव समितीच्या पदाधिका-यांनी सहकार्य केले.

सार्वजनिक बांधकाम विभाग-

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी-एरंडोल येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करताना माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी त्यांचेसोबत कृष्णा धनगर,शालिग्राम गायकवाड व पदाधिकारी.

टीम झुंजार