अंगावर खाज आणणारी वनस्पती टाकून पाच लाख रुपये लंपास ; पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली

Spread the love

चोपडा : – सध्या महाराष्ट्रात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच चोपडा शहरातील बँकेतून रोकड काढून गॅस एजन्सीकडे निघालेल्या मॅनेजरच्या अंगावर, खाज आणणारी वनस्पती टाकून चोरट्याने, त्यांच्या ताब्यातील पाच लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ३१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास लोहाना पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. चोपडा शहरातील हॉटेल योगी जवळील इंडियन गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये केशरलाल मोतीलाल पाटील (वय ४५, रा.गरताड) हे मॅनेजर आहेत. मंगळवारी दुपारी पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी रमेश सोनवणे हे दोघे दुपारी ३.२५ वाजता, शहरातील जुना शिरपूर रोडवरील स्टेट बँकेत

घटना सीसीटीव्हीत चित्रित पैशांची बॅग घेऊन पळून जाणारा संशयित बापू टी स्टॉलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दिवसाढवळ्या दोन संशयितांनी पाच लाखांची बॅग लंपास केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाठलाग करूनही दोघे पसार दोघे संशयित पंचायत समितीच्या दिशेने पळून गेले. पंचायत समिती समोरील एका दुकानावर बसलेल्या काही जणांना दोन्ही संशयित जातानांना दिसले. यावेळी केशरलाल पाटील व त्यांच्या सोबत असलेले रमेश सोनवणे यांनी पंचायत समितीकडे संशयितांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघे संशयित बाजार समितीकडून हॉटेल योगीकडे गेले की, बाजार समितीच्या मागून पंकज नगर, बसस्टॅण्डकडे गेले हे समजले नाही. त्यामुळे पळून जाण्यात दोघे यशस्वी झाले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन संशयितांवर कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

टीम झुंजार