
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल- येथील एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दुर्गादास राजाराम महाजन तर उपाध्यक्षपदी पंडित लकडू सूर्यवंशी यांची बिनविरोध आवड करण्यात आली.संस्थेच्या संचालक मंडळाची यापूर्वीच बिनविरोध निवड करण्यात आली होती.
संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली अध्यक्षपदासाठी दुर्गादास राजाराम महाजन यांचा तर उपाध्यक्षपदासाठी पंडित लकडू सूर्यवंशी यांचेच एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी एच.डी.पाटील यांनी काम पाहिले.सभेस विजय महाजन,राजेंद्र चौधरी,नितीन महाजन,योगराज महाजन,ईश्वर पाटील,रवींद्र महाजन,राजधर महाजन,वामन धनगर,रघुनाथ ठाकूर,सुमनबाई माळी,निर्मला महाजन आदी संचालक उपस्थित होते.अध्यक्ष दुर्गादास महाजन आणि उपाध्यक्ष पंडित सूर्यवंशी यांचे विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिका-यांनी अभिनंदन केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रमेश परदेशी,रवींद्र महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख advt.किशोर काळकर,माजी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,संजय महाजन,राजेंद्र महाजन,अरुण पाटील,रुपेश माळी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,गोपाल पाटील,शांताराम महाजन,अमरसिंग परदेशी,विक्रम महाजन,सुदर्शन महाजन,चंद्रकांत महाजन,परेश बिर्ला,प्रशांत महाजन,अतुल महाजन,प्रल्हाद महाजन,सुरेश देशमुख,अजय महाजन,मोहन महाजन,राजेश महाजन,कुणाल महाजन
यांचेसह विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतक-यांच्या समस्या सोडवून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष दुर्गादास महाजन आणि उपाध्यक्ष पंडित सूर्यवंशी यांनी सांगितले.
फोटो ओळी-एरंडोल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दुर्गादास महाजन उपाध्यक्ष पंडित सूर्यवंशी यांच्या निवडीप्रसंगी उपस्थित विविध संस्थांचे पदाधिकारी.





