लोणार तालुक्यातील कोयाळी – उदनापूर येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल यादीतुन पात्र व गरजू लाभार्थ्यांना वगळल्या मुळे गावकऱ्यांची तक्रार.

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येत नसल्यामुळे गावकरी नाराज ……

लोणार : – लोणार तालुक्यातील उदनापूर कोयाळी गट ग्रामपंचायत येथील महिला व पुरुषांनी सह्यानिशी आज दिनांक 30 मे 2022 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती लोणार यांना वेगवेगळ्या प्रकारचे दोन तक्रार अर्ज देऊन आपल्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा पंधरा दिवसात मागण्या मान्य न झाल्यास थेट उपोषणाचा इशाराच दिला आहे.


पहिल्या तक्रार अर्जामध्ये नमूद असल्याप्रमाणे गावाला असलेले ग्राम विकास अधिकारी श्री अमोल अरुणराव काळवाघे हे गावामध्ये व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिन्यातून फक्त एक किंवा दोन दिवसच हजर असतात बाकीचे गावातील लोकांना त्यांच्या लोणार येथील निवासस्थानी बोलवून अर्धवट कामे करतात म्हणून काळवाघे यांची बदली करून गावाला दुसरे ग्रामपंचायत सचिव मिळावे.तसेच दुसऱ्या तक्रार अर्जामध्ये नमूद असल्याप्रमाणे उदनापूर,कोयाळी येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल यादीतून पात्र व गरजू लाभार्थ्यांना वगळून आवश्यकता नसलेल्या लोकांना सरपंच व सचिव यांनी संगनमताने घरकुल मंजूर केल्याचे तक्रार अर्जामध्ये नमूद आहे.


तक्रार अर्जावर देविदास मुळे व दीपक मुळे यांच्यासह बऱ्याच गावकऱ्यांच्या सह्या असून नेमके या तक्रारी वरून गटविकास अधिकारी काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून आहे.

टीम झुंजार