उत्राण विकासो चेरमनपदी ज्योती महाजन,व्हा.चेरमनपदी दशरथ धोबी यांची बिनविरोध निवड-

Spread the love

प्रतिनिधी । उत्राण (प्रकाश कुंवर)
एरंडोल:
तालुक्यातील उत्राण येथील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या संचालकाची मिटींग संपन्न झाली.या मिटींगमध्ये चेरमनपदी ज्योती महाजन तर व्हाईसचेरमनपदी दशरथ धोबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीची चेरमनपदाची निवडसाठी निवडणुक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे एकमेव अर्ज दाखल करण्यात आला म्हणून चेरमनपदी ज्योती दत्तात्रय महाजन व व्हाईस चेरमनपदी दशरथ धोबी यांची बिनविरोध निवड झाली ,

नवनिर्वाचित संचालक विलास महाजन,सुमनबाई पाटील,ज्ञानेश्वर पाटील,पंकज महाजन,संजय महाजन,ईश्वर धनगर,काशिनाथ चौधरी,आनंदा धनगर,मो हरून देशमुख, श्रीकांत पाटील , भारत देवरे, ,आदी नवनिर्वाचित सदस्यांचे विकासोसायटीत मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला,निवणुक निर्णय अधिकारी म्हणून अनिल पवार ,तर सचिव मनोज पाटील यांनी कामकाज पाहिले तर शिपाई राजेंद्र गुरव यांनी परिश्रम घेतले,

निवडून सदस्यांचे सरपंच भागवत पाटील,ग्राम पंचायत सदस्य गुरुदास चौधरी,पांडुरंग पाटील,बाळू धनगर,प्रफ्फुल तिवारी ,हेमंत पाटील,अरुण पाटील,विजय महाजन,राजू पवार, आजी माजी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते

टीम झुंजार