
शेकडो दिव्यांग बांधवांची उपस्थिती
धरणगाव : – आज धरणगाव येथे दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रम मा.गुलाबरावजी पाटील (पालकमंत्री) यांच्या हस्ते संपन्न झाला.ह्या प्रसंगी यु.डी.आय.डी कार्ड , पिवळे रेशनकार्ड,सि.आर.पी.महिला प्रतिभा उदयभान पाटील, मंदाकिनी रवींद्र जाधव, छाया विलास आवटे ,प्रतिभा नाना पाटील, पुष्पाबाई सैंदाणे, कोरोना योध्दा म्हणून प्रतिभा फकीरा पाटील सरला सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला तसेच दिव्यांग शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.ऋषिकेश जाधव सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .

याप्रसंगी मा.भरतजि चौधरी साहेब(वै.सा.का.जळगाव),मा.गुलाबजी वाघ जिल्हाध्यक्ष शिवसेना) , नरेश चौधरी (नगराध्यक्ष धरणगाव)पी.एम.पाटील (जिल्हा ध्यक्षअपंग महासंघ), संजय पाटील (तालुकाध्यक्ष अपंग महासंघ) भानुदास विसावे,मुथा,राजु चौधरी व अपंग महासंघाचे पदाधिकारी तसेच मुकबधीर विद्यालय व मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.





