संतापजनक ! वर्गमित्रानं केला विवाहित तरुणीवर बलात्कार

Spread the love

पुणे : पुण्यातून बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आलीय. औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने 26 वर्षीय नवविवाहित तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्याने या पीडितेवर बलात्कार करुन तिचे अश्लिल फोटोही काढले. तसेच ते तिच्या पतीला पाठवून तिची बदनामीही केली. प्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश पांडुरंग करगळ (वय – 26, रा. चांदोर, ता. भूम, जि. उस्मानाबाद), असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी अविनाश करगळ आणि पीडित तरुणी औरंगाबाद येथे एमसीएचे शिक्षण घेत होते. याचदरम्यान, त्यांची ओळख झाली. त्यानंतर एमसीएच्या तीन महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी हिंजवडीतील एका कंपनीत गेले होते. त्यामध्ये आरोपी अविनाश आणि पीडित तरुणीचाही सहभाग होता

मात्र, काही दिवसांपूर्वीच अविनाशने या विवाहित तरुणीला वाकड येथील एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर दोघांचे अश्लिल फोटोही काढले. तसेच ते फोटो पीडित तरुणीच्या पतीला पाठवण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केले

या प्रकरणात पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjawadi Police Station) तक्रार दिली. यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विवाहित तरुणीवर बलात्कार केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

टीम झुंजार