किर्गीस्तानचे राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांचेसह मान्यवरांचा आज सत्कार.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी एरंडोल- येथील गांधीपुरा भागातील मूळ रहिवासी तथा किर्गीस्तानचे भारतातील मुख्य राजनैतिक अधिकारी देवेंद्रभाऊ साळी यांनी भारत किर्गीस्तान आणि भारत मॉरीशस या देशांचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल एसएमटी युनिवर्सिटी यु.एस.ए.यांचेतर्फे नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड ऑननरी डॉक्टरेट (विद्या वाचस्पती) मिळाल्याबद्दल

त्यांचा आज रविवार (ता.५) सायंकाळी पाच वाजता सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात सत्कार करण्यात येणार आहे.तसेच यावेळी सकाळचे तालुका बातमीदार आल्हाद जोशी,पत्रकार संजय चौधरी आणि रा.हि.जाऊ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी याना राज्यस्तरीय नारीदीप सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.

भाजपचे प्रदेश जनजातीय क्षेत्र प्रमुख अँड.किशोर काळकर,अध्यात्म वाचस्पती अतुल शास्त्री (भगरे गुरुजी) यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून आमदार चिमणराव पाटील अध्यक्षस्थानी राहणार आहेत.माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,प्रांताधिकारी विनय गोसावी,अँड.ओम त्रिवेदी,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,जळगावचे नगरसेवक मामासाहेब देशमुख,जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी संजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र साळी यांनी यापूर्वी शहरासह ग्रामीण भागात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून कोरोनाच्या काळात शहरातील सर्व नाभिक बांधवाना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले आहे.देवेंद्र साळी यांचे शिक्षण एरंडोल येथील काबरे विद्यालयात झालेले असून त्यांच्या वर्गातील १९८८ या वर्षातील दहावीच्या वर्गातील विद्यार्थी व मित्र परिवाराच्यावतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,उद्योजक पंकज काबरा,आय.टी.आय.चे प्राचार्य सुधीर महाजन व आयोजकांनी केले आहे.

टीम झुंजार