
चोपडा : – जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना नाशिक झोनच्या पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे, १७ राउंड व कार असा एकूण ७ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, १ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. ताब्यातील आरोपींची चौकशी केली असता गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

रवींद्र वसंत खोर्गे (वय २४), जिजाबा फाळके ( वय ३९), चांदपाशा शेख ( वय ३२), जयेश भुरूक (वय २४ ) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपीचे नाव आहे आहेत. तर सतनामसिंग जुनैजा हा पाचवा आरोपी पसार झाला आहे सर्व पुण्यातील रहिवासी आहेत. तर, मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला सतनामसिंग जुनैजा हा आरोपी फरार झाला आहे. तर, पसार आरोपी सतनामसिंग जुनैजा यास पकडण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीच्या छातीवर वार करून ” तेरे मे धम हैं मुझे पकड के दिखा” असे बोलून शासकीय कामत अडथळा निर्माण केला. पसार आरोपीने अटकेतील आरोपींना दरोडा टाकण्याच्या उद्देशाने प्राणघातक श्स्र्तरे विक्री केली. व दरोडा टाकण्यासाठी मदत केल्या प्रकरणी पोह्स्को मनोज अशोक दुसाने यांनी दिलेल्या दीर्यादींनुसार चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे अन्य एका आरोपीची ओळख अद्याप पटली नसून तोही फरार आहे. या सहा आरोपींविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 399, 402, 323, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशिर तडवी, रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शकील शेख, मनोज दुसाने, कुणाल मराठे, प्रमोद मडलीक, सुरेश टोंगारे, चोपडा पोलिसांच्या पथकातील निरीक्षक अवतारसिंग चव्हाण चोपडा, उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, राकेश पाटील, प्रमोद पारधी, किरण धनगर, किरण पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.









