भर रस्त्यात आडवा करत तरुणाचे तुकडे-तुकडे ; घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा Video समोर

Spread the love

भंडारा : – प्रेम प्रकरणातून भंडाऱ्यात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडलीय. धक्कादायक म्हणजेच भर रस्त्यात हायवेवर आडवा करत तरुणाचे तुकडे-तुकडे करण्यात आले.या घटनेने महाराष्ट्र हादरून गेला आहे. हत्येचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. सचिन मस्के असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी तीन जणांवर हत्येचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस आता कायदेशीर कारवाई करत आहेत.

काय आहे घटना ?

सचिन मस्के या तरुणाचे एका मुलीसोबत प्रेम संबध होते. हे दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. मात्र या दोघांच्या प्रेमाला घरच्यांची परवानगी नसल्याने, हे दोघेही लपून-छपून एकमेकांना भेटत होते. हे दोघेही सतत एकमेकांसोबत फोनवर देखील बोलत असत. हे दोघेही एकमेकांच्या फोनवर देखील सतत बोलत आहेत, ही बाब घरच्यांना माहिती होती. पाच सहा दिवसांपुर्वी सचिन आपल्या प्रेयसीला घेऊन पळून गेला. दोन दिवस हे दोघेही गायब होते. मुलीच्या घरच्यांनी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर, हे दोघेही आपापल्या घरी परतले.

प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेल्यानंतर दोघेही आपापल्या घरी परतल्यानंतर, परिसरातील अनेकांना हे प्रकरण माहिती पडलं, आणि या सगळ्यांचा संताप म्हणून, या तरुणीचा भाऊ संतापला. काहीही करून सचिन मस्के या तरुणाचा काटा काढायचा त्याने निर्धार केला. त्यानुसार सचिनला तिघांपैकी एकाने आपल्या गाडीवर बसवून आणले. सचिनला आपल्या गाडीवर बसवून शहराच्या बाहेर एका रस्त्याच्या कडेला उतरवण्यात आलं. ज्या ठिकाणी सचिनला उतरवण्यात आलं, त्या ठिकाणी सुरा घेऊन एक व्यक्ती तयारच होता. पुढच्या काही मिनिटांत आपला जीव जाणार आहे, याची जराही कल्पना सचिनला नव्हती. सुरा असणारा व्यक्ती धावत धावत सचिन जवळ आला, आणि सचिनच्या अंगावर धारदार शस्त्राने वार करू लागला.

सचिन मस्के खाली पडल्यानंतर, नराधमाने त्याला रस्त्याच्या मध्यभागी आणून कोयत्याने त्याच्या मानेवर वार केले. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा हृदय पिळवटून टाकणारा घटनाक्रम कैद झाला आहे. या व्हिडिओत या नराधमाने सचिनवर सपासपा केलेले, वार पाहून काळजाचं पाणी पाणी होत आहे. आता या तिन्हीं आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तिघांवर आता ह त्ये चा गु न्हा नोंदवला असून, पोलीस आता कायदेशीर कारवाई करत आहेत.

टीम झुंजार