शिवराज्याभिषेक सोहळ्याचे निमित्त वेणी येथे भव्य रक्तदान शिबिर

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- लोणार तालुक्यातील वेणी येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,वेणी येथील शिवस्मारक समिती च्या वतीने रक्तदान चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता,6 जुन अर्थात शिवराज्याभिषेक हा दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडे खरे जनतेचा राजे म्हणून पाहिले जाते.

शेतकऱ्याच्या देठालाही हात लावू नका अशी शिकवण देणारे व सर्वसामान्य योग्य न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती.अशा थोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वेणी येथे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले,यावेळी गावातील 70 नागरिकांनी रक्तदान करून हा उत्सव आनंदात पार पडला.यावेळी सौ.कांतादेवी डोळे ब्लड बँक वाशीम यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला,या उपक्रमाला गावातील सर्व शिवभक्तांचे मोलाचे सहकार्य लाभले शिवाय हा दिन एखाद्या उत्सवा प्रमाणे साजरा करण्यात आला.रक्त काढून नाही तर रक्त देऊन उपक्रम राबविण्यात वेणी गाव अग्रेसर राहिले….


यावेळी उपस्थित शिवस्मारक समिती अध्यक्ष राम खोतकर,सरपंच अभिमन्यू भाऊ साखरे,पं.स. मा.सदस्य मनोज भाऊ तांबिले,उपसरपंच विष्णू जावळे,सोसायटी अध्यक्ष राजू तांबिले,तंटामुक्ती अध्यक्ष गजानन काकडे,सोसायटी उपाध्यक्ष दीपक साखरे,संतोष देशमुख,प्रल्हाद देवकर,प्रल्हाद जावळे,सचिन सूर्यवंशी,अनिकेत हरदाळकर,अक्षय पवार,आदी करून उपस्थित होतेे

यावेळी सूत्रसंचालन विष्णू साखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाम ठाकरे यांनी केले.

टीम झुंजार