शेती पडीक पाडली तर गवत उगवते आणि शरीराला व्यायाम नाही दिला तर इतर आजार वाढतात ‌ ॲड .सौ. लता जगताप पाटील

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
करमाळा : (जि. सोलापूर )
करमाळा शहरातील सर्व 10 ते 17 आणि 40 पेक्षा अधिक वयोगटातील पुरुष आणि स्त्रिया यांच्यासाठी मोफत शारीरिक शिक्षण प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष किसन कांबळे यांनी ठाणे जनता सहकारी बँकेच्या सौजन्याने महेश वैद्य फिटनेस अकॅडमी मुंबई यांचे प्रशिक्षक महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथे किल्ला विभागातील जयवंतराव जगताप सभागृहात आयोजित केले होते.

या कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ. लता जगताप पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्रीराम परदेशी विनोदकुमार शेठ गांधी अजित सोळंकी, दत्ता मनसुखे , गजानन विभूते, करमाळा शहराच्या भाजप महिला अध्यक्षा संगीता नष्टे, करमाळा शहरातील उद्योजिका निर्मला जाधव, करमाळा नगरपालिका महिला बचत गटाच्या वंदना कांबळे, कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या शिक्षिका कल्पना वाघमारे कांबळे, कन्या विद्यालयाच्या शिक्षिका ज्योती शहाणे बोकन, मंजिरी जोशी, मीनाक्षी माने करमाळ्यातील महिलांना उद्योजिका बनविण्यासाठी सतत प्रयत्नशिल असलेल्या उद्योजिका माधुरी परदेशी, आदर्श भगिनी उषा सुरवसे, करमाळा शिवसेना शहर महिला अध्यक्षा प्रियांका गायकवाड मॅडम लघू व्यावसायिका दुर्गा राजमाने, ज्योती काळे इ.मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शुक्रवार 27 मे पासून रविवार 29 मे 2022 पर्यंत सलग तीन दिवस सकाळी पुरुषांसाठी आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत महिलांसाठी शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी महेश वैद्य फिटनेस कॅम्प अकॅडमी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष महेश वैद्य यांनी योग्य ते कृतीयुक्त प्रशिक्षण दिले.

आरोग्या विषयीची जाणिव जागृतीची गरज असल्यामुळें हा कार्यक्रम घेतला असल्याचे मनोगत कार्यक्रमाचे आयोजक किसन कांबळे सर यांनी व्यक्त केले. उपस्थितांना मार्गदर्शन संगीता नष्टे, ज्योती शहाणे बोकन वंदना कांबळे यांनी केले.

कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या शिक्षिका कल्पना वाघमारे कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या जीवनाचा पाया आरोग्य आहे आणि यावरच आपल्या आयुष्यरुपी इमारतीची उभारणी झालेली आहे ज्याचे आरोग्य चांगले त्याचं आयुष्य त्याने जास्त आनंदात घालवले आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे माध्यमिक विभागाचे करमाळा तालुका अध्यक्ष संजयकुमार राजे घोरपडे सर यांनी केले..!

टीम झुंजार