
लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- लोणार तालुक्यातील दाभा येथील महिलांनी अवैध दारू विक्री च्या विरोधात ग्रामपंचायत वर मोर्चा नेऊन अवैध दारू विक्री बंद करावी. गावातील तरुण बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पानठेला,चहाची टपरी,पाणी पुरी गाडा अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र,आता कमी गुंतवणुकीत जास्त नफा कमावण्याच्या नादात अवैध दारू विक्री,जुगार,गुटखा अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे.
पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही,तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा समज आहे.त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच तालुक्यात दारूचा व्यवसाय हा गृह उद्योग उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे.तरूणांनी दारू,गुटखा स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले आहे.घरून पाहिजे तेवढा पॉकेटमनी मिळू शकत नाही,मिळालेल्या पॉकेटमनी मध्ये तरूणांच्या गरजा भागू शकत नाहीत़,यावर तरुणांनी उपाय शोधला असून,जास्त पैसा कमावण्यात तरूण लागले आहेत. तरुणांसोबत ग्रामीण भागातील लहान लहान मुले देखील व्यसनाधीन झाले असून दारू पिण्याची सवय झाली. प्रत्येक गावात ठरावीक ठिकाणी दारू खुलेआम मिळत असल्याने दारू पिणाऱ्या ची सांख्या वाढत आहे.
अनेक तरुण लहान मुले सुद्धा व्यसनाच्या आहारी गेले आहेत.त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत दारू व्यसनाच्या नादी लागुण कित्येक तरुणाचे अवैध धंद्यांनी दारूच्या नशेने कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत.तरीही या दारूची नशाच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात.त्यानंतर मात्र,परिस्थिती जैसे थे असते. लोणार पोलिस स्टेशन च्या हद्दीत दाभा पहुर या खुलेआम दारू इतर अवैध व्यवसाय सुरू आहे.
दाभा ग्रामपंचायत मध्ये शिवस्वराज्य दिनाच्यादिवशीच चक्क गावातील त्रस्त महिलांनी शिवस्वराज्य दिनांचे ध्वज पुजन करून अवैद्य दारू विक्री बंद करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचयत मध्ये आक्रोश करून दारू बंद करण्याची मागणी केली असून या अगोदर सुद्धा अनेक वेळा अवैद्य दारू विक्री बंद करण्याची मागणी केली.
तशेच सदर महिलांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दाभा गावात व्यक्ती घरपोच मजुरांच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक शेतशिवरतील मुख्य रस्त्यावर उभे राहून दारू विक्री करत असल्याचे दारू विक्री बंद करण्याची मागणी राधा विजय रणबावरे दाभा गावच्या महिला उपसरपंच शोभबाई रमेश प्रधान, सरस्ववती बोखारे,सिंधुबाई बाजड,गोदावरी प्रधान,सह दाभा गावातील महिलांनी गेली असून दाभा गावातील अवैध दारू विक्री सह दारू वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे.







