
झुंजार प्रतिनिधी
वाघोदा :- रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा परिसरामध्ये झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आज दिनांक 8 जून 2022 रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास वाघोदा परिसरामध्ये जोरदार वादळामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले
असून केळीचे खोड मोडून पडले आहे या वादळामुळे शेतकरी चिंतेत आहे.एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान तसेच आज झालेल्या वादळ मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे सध्या शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमोडले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील,जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लवखरात लवखर आदेश काडून सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत





