अ.भा.धोबी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष ठोंबरे यांचा शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । संतोष कदम.
कन्नड- (सरसेनानी)
अखिल भारतीय धोबी महासंघाचे औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुभाष लक्ष्मण ठोंबरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रभावीत होत आज वंचित बहुजन आघाडीत आपल्या विविध जाती समुहातील समर्थकांसह कन्नड येथे झालेल्या पक्षाच्या तालुका पदाधिकारी आढावा बैठकीत जाहीर प्रवेश केला

त्यांच्या सोबत दिपक बाबुराव सुरे, कैलास शंकर सुरे, रवि दौलत गायकवाड, अरुण पांडुरंग गायकवाड, अनिल भगवान खरात, हिरालाल जगन शेवाळे यांच्या सह शेकडो विविध समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पच्श्रिम जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर,कन्नड तालुकाध्यक्ष देविदास राठोड यांनी प्रवेश करत्याचा सत्कार केला

यावेळी , जिल्हा कार्यकारिणी सदस्य संघराज धम्मकिर्ती,जिल्हा उपाध्यक्ष कचरु मेगाळ, जिल्हा संघटक काकासाहेब आळीग, जिल्हा सचिव अँड संदीप शिरसे,तालुका महासचिव रईस सौदागर, आदींची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला राहुल बहिरव,, मारुती खिरडकर अरुण गायकवाड, शेख मोहम्मद यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

टीम झुंजार