
लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- विविध मागण्या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज 9 जून रोजी लोणार तहसील चे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कृषी सेवा केंद्रावर आधार ऑनलाईन नोंदणी बंद करण्यात यावी व त्यासोबतच अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाली नाही शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ देण्यात यावी व महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या महामंडळाच्या सोयाबीन बियाणाच्या प्रत्येक बॅगवर 2000 अनुदान देण्यात यावे.
ऐन पेरणीच्या वेळेसच शेतकऱ्यांना परेशानी चा सामना करावा लागत आहे खत- बियाणे वाढलेले दर त्यातच शेतकऱ्यांना काही कृषी केंद्रावर स्टॉक असतानासुद्धा शेतकऱ्यांना पाहिजे असलेल्या खतांचा तुटवडा निर्माण करून अधिकच्या भावाने विक्री करणे,बियाण्याचे भाव मागील वर्षी च्या तुलनेत वाढले आहेत त्यात सर्वसामान्य शेतकऱ्याला राज्य सरकारने प्रतिबंध दोन हजार रुपये अनुदान द्यावे व खताचा साठवणूक करून काळाबाजार करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे बँकांनी मागील थकबाकी शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड करून शेतकऱ्यांना अधिक अडचणीत आणण्याचे काम केले आहे, शेतकऱ्यांनी आपले हरभरा नाफेड मध्ये विक्री केल्यानंतर बँकेचा खाते क्रमांक दिलेला आहे परंतु खात्याला होल्ड लागल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज तर सोडाच परंतु खात्यातील पैसे काढून सुध्दा खते बियाणे विकत असे घ्यावे हाच मोठा प्रश्न बळीराजा पुढे पडला आहे. शिवाय कृषी केंद्रावर खत खरेदीसाठी गेलेले शेतकरी बायोमेट्रिक शिवाय खत खरेदी करता येत नाही नेटवर्क व लिंकच्या असुविधेमुळे शेतकऱ्यांना ते सुद्धा अवघड होऊन बसले आहे,त्यासाठी बायोमेट्रिक ही पद्धत बंद करण्यात यावी.
अशा विविध मागण्यांसाठी भारतीय जनता जनता किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले की,
१)शेतकर्यांना नवीन पीक कर्ज देण्यात यावे.
२)खत बियाणे खरेदी करत असताना ची बायोमेट्रिक पद्धत बंद करण्यात यावी.
३)सोयाबीनचे बियाणे खरेदीसाठी बॅग मागे दोन हजार रुपयांचे अनुदान द्या देण्यात यावे.
यावेळी शहराध्यक्ष गजानन मापारी,जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा मारोतराव सुरूसे,विजय मापारी,प्रकाश नागरे,उद्धव आटोळे,प्रकाश मुंडे,भगवानराव सानप,बाबाराव जाधव,गणेश गाडेकर,गणेश तांगडे,श्रीधर तारे,समाधान डव्हळे,माधव गाढवे व इतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





