स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढणार-तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील.

Spread the love

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल-आगामी काळात होणा-या नगरपालिका,जिल्हापरिषद व पंचायत समिती यासारख्या स्थानिक सवराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढवणार असून कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहावे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्रा.मनोज पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीसाठी शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनुकूल वातावरण असून,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे व केलेली कामे याची माहिती घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले. युवकांना पक्षात सामावून घेण्यासाठी सर्वांनी सामुहिकपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.नगरपालिका आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून पक्षसंघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत असल्याचे सांगितले.यावेळी राष्ट्रवादी कोंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावर होते.

कार्यक्रमास माजी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,असलम पिंजारी,जिल्हासरचिटणीस डॉ.राजेंद्र देसले, राजेंद्र शिंदे अँड.अहमद सय्यद,संदीप वाघ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलू चौधरी,युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष कपिल पवार,रवींद्र पाटील,किशोर पाटील,सरपंच सिताराम पाटील,ईश्वर बिर्हाडे,विकास साळुंखे,प्रशांत पाटील,नरेश भोई,किरण भोई,मयूर मराठे,भूषण चौधरी,

रवींद्र चिंचाडे,विनीत महाले,शुभम पाटील,रवींद्र भोई,अमोल भोई,दीपक भोई,दिनेश सुतार,अजय मराठे,सदुसिंग जोहरी,ईश्वर मराठे,चेतन मराठे,ऋषिकेश पाटील,प्रमोद भोई,सागर धीसाडी,दिनेश महाजन,शाम बोरसे,हितेश महाजन,भूषण गायकवाड,प्रमोद जाधव,प्रशांत चौधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टीम झुंजार