
सोयगाव :- जिल्हाभरात पाऊस कोसळत असतांना मात्र सोयगाव तालुक्यात मृग नक्षत्र कोरडे जाण्याची भीती व्यक्त होत असतांना शनिवारी सोयगावच्या वेताळवाडीच्या जंगलात मृगाच्या जोरदार पावसाचे संकेत देणारा ठिपकेदार पिंगळा दुर्मिळ असा पक्षी आढळल्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारी घटना शनिवारी घडली आहे त्यामुळे सोयगावच्या शेतकऱ्यांना मृगाच्या जोरदार हजेरी लागण्याचे संकेत या दुर्मिळ पिंगळा पक्षाने शनिवारी दर्शन देऊन दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात आला आहे मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा होण्याच्या मार्गावर असताना मात्र सोयगावला मृग नक्षत्र कोरडे जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत असताना दुर्मिळ पिंगळा पक्षी अचानक आढळल्याने सोयगाव तालुक्यात जोरदार पावसाचे संकेत या पक्षाकडून मिळाले आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा निरीक्षणात हा पक्षी आढळला असून वन विभागाने त्याचे छायाचित्र टिपून त्याच्या आकाशा कडे एक टक पाहण्याच्या हालचालीही टिपल्या आहे त्यामुळे या पक्षाकडून खरिपाच्या हंगामाचे संकेत देण्यात आले असल्याने सोयगावच्या शेतकऱ्यांना दिलासादायक व गोड बातमी वन विभागाकडून मिळाली आहे
जुन्या जाणकारांच्या मते हा दुर्मिळ पक्षी पावसाळ्यातच आढळतो मात्र पाऊस जोरदार होणार असेल तरच हे पक्षी बाहेत बागडतात त्यामुळे जास्त पावसाचे लक्षणे दुर्मिळ पिंगळा पक्षी देतात असा दुजोरा जुन्या व जाणकार शेतकऱ्यांनी दिले आहे
दुर्मिळ पिंगळा पक्षी आढळल्या मुळे सोयगाव तालुक्यात मृगाच्या खरीप पेरण्या होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहे





