जमिनाचा वाद : संख्या भावाच्या डोक्यात मारली कुऱ्हाड; घटनेत एक जण जखमी.

Spread the love

धरणगाव (पाळधी ) :- वडीलोपार्जीत शेतीच्या वाटणीवरुन भावाने संख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड मारली. जळगाव शहराला लागुन असलेल्या पाळधी गावात आठ जून रोजी रात्री ही घटना घडली. तर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्ताक अब्दुल बासीद देशमुख (वय 45, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.

घटना अशी की, देशमुख कुटुंबियांची पाळधी शिवारात घटना अशी की, देशमुख कुटुंबियांची पाळधी शिवारात वडीलोपार्जीत शेती आहे. शेतीच्या वाटणीवरुन भावांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. या वादाचा भडका आठ जून रोजी सकाळी आठ वाजता उठला. यावेळी मुस्ताक यांच्या घरी त्यांचे भाऊ सलीम, आलिम, सोहेल, दानिश व जैम हे सर्वजण आले. वाटणीवरुन पुन्हा एकदा वाद सुरू झाले. या वादातून सर्वांनी मिळुन मुस्ताक यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. तर आलिम देशमुख याने थेट कुऱ्हाडीने डोक्यात वार करुन मुस्ताक यांना जखमी केले.

जीवे मारण्याची धमकी

या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुस्ताक यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार हल्ला करणाऱ्या चौघांवर धरणगाव पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा तपास करीत आहेत.

टीम झुंजार