
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- फेसबुक अकाऊन्ट वर भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पाठींबा असल्याची कॉमेन्टस पोष्ट व्हायरल केल्याबद्दल एरंडोल शहरातील भोई गल्लीतील संशयीत युवक मंगेश विलास भोई या युवकास दि ११:६:२०२२ रोजी अटक करण्यात आली होती.एरंडोल पोलीस स्थानका समोर काही काळपर्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलीस प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांनी शांततेचे आव्हान केल्या मुळे परिस्थिती नियंत्रणात आली. संशयित युवकास दिनांक १२.०६.२०२२ रोजी न्यायालयात आणले. सदर एरंडोल न्यायालयाचे न्यायाधीश विशाल धोंडगे साहेब रजेवर असल्याने धरणगांव न्यायालयात आरोपीस हजर केले असता
मा. धरणगांव न्यायालयांचे न्यायाधिश ढोके साहेब यांनी सरकारी व आरोपी पक्षांचे युक्तीवाद ऐकुन सदर आरोपी मंगेश विलास भोई यास अटीशर्ती वर रूपये पंधरा हजाराचे जामिन मंजूर केला. सदर आरोपी तर्फे अँड ज्ञानेश्वर बळिराम महाजन एरंडोल यांनी व अँड पारेख यांनी काम पाहिले.





