एरंडोल येथे भाजपच्या दोन गटांनी केला राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा जल्लोष! दोन स्वतंत्र कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे सर्व तीनही उमेदवार विजयी झाल्यामुळे भाजपतर्फे फटाके फोडून आणि मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला.मात्र शहरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी,जिल्हास्तरीय पदाधिकारी व भाजपचे शहराध्यक्ष व त्यांच्या समर्थकांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे पक्षातील गटबाजी उघड झाली आहे.

शहरात भाजपच्या पदाधिका-यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल,माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तीनही उमेदवार विजयी झाल्यामुळे भाजपतर्फे बुधवार दरवाजा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटप करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिका-यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी मंत्री गिरीश महाजन यांचेसह भाजप समर्थनार्थ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.यावेळी आगामी काळात होणा-या विविध स्थानिक सवराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल असा विश्वास पदाधिका-यांनी व्यक्त केला.यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,भाजपचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव,संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष सुनील पाटील,माजी नगरसेवक,जहिरोद्दिन शेख कासम,

भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत महाजन,शहराध्यक्ष सुनील चौधरी,माजी नगराध्यक्ष डॉ.जयश्री पाटील,संध्या महाजन,आरती ठाकूर,नयना पाटील,मंगला पाटील,गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल गुजर,व्यापार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी,संजय साळी,वाल्मिक सोनावणे,अजेंद्र पाटील,धनराज पाटील,तुषार वाघ,समीर पठान,लोकेश महाले,प्रदीप महाजन,पिंटू साळी,रवींद्र महाजन,विलास महाजन,शेखर राजपूत यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.कार्यक्रमात ग्रामीण भागातील कार्यकत्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेवून भाजप समर्थनार्थ घोषणा दिल्या.

भाजपच्या दुसऱ्या गटातर्फे आनंदोत्सव साजरा
भाजपचे शहराध्यक्ष निलेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली दुस-या गटातर्फे राज्यसभा निवडणुकीतील विजयाबद्दल जल्लोष करण्यात आला.यावेळी अँड.मधुकर देशमुख,पिंटू राजपूत,अमर राजपूत,शाम ठाकूर,सचिन विसपुते,रमेश महाजन,मोहन लोहार,किशोर पाटील,रतिलाल सोनार,भूषण बडगुजर,सोनू वंजारी,हितेंद्र परदेशी,बाळू वंजारी उपस्थित होते.

दरम्यान राज्यसभा निवडणुकीतील विजयाच्या जल्लोषाचे दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्यामुळे निष्ठावान पदाधिका-यांनी नाराजी व्यक्त केली.दोन स्वतंत्र कार्यक्रमांमुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून पक्षनेतृत्वाने गटबाजीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

टीम झुंजार