वडगाव तेजन येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या…

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे दि.11 जून 2022 रोजी शेतकरी पुत्र केशव आत्माराम शिरसाट वय 32 या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलि आहे.त्याच्या पश्चात आई,वडील,भाऊ,बहिनि,पत्नी व मुलगी असा बराच मोठा परिवार आहे.

सदर घटनेचा कडुबा आत्माराम शिरसाट यांनी लोणार पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मर्ग क्रमांक 23/22 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास लोणार पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली ना.पो.का.पंडित नागरे व सहकारी करीत आहेत.घडलेल्या घटनेमुळे वडगाव तेजन सह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टीम झुंजार