भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा अन्यथा उपोषण….

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्यातील भुमराळा येथे सन २०२१-२२ मध्ये गौण खनिज निधीमधून स्मशानभूमी ला तार कुंपण करण्यात आले होते.सदर काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे यामध्ये संबंधित ठेकेदार व J.E.राठोड यांनी संगनमत करून हे काम निकृष्ट दर्जाचे करून यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे

त्यानंतर गौण खनिज निधीमधून सिमेंट रस्ता करण्यात आला यामध्ये सुद्धा संबंधित ठेकेदार,J E, सरपंच,सचिव यांनी संगनमत करून निकृष्ट दर्जाचे काम केले आहे.तसेच सार्वजनिक ठिकाणी गट्टू बसविण्याचे काम करण्यात आले असता यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.तसेच मागासवर्गीय वस्तीतील विहीर दुरुस्ती करण्यात आली यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.


तरी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर फौजदारी सारखे गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून केलेल्या निकृष्ट कामाची रक्कम वसूल करावी अन्यथा १६ जुन रोजी पंचायत समिती लोणार येथे आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा गणेश टेकाळे सह अन्य दोघांनी निवेदनाद्वारे दिला आहेे

टीम झुंजार