
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल : – शहराचा सर्वांगिण विकास होऊन शहरवासियांना मुलभुत सुविधां अभावी कुठलीही गैरसोय होऊ याची वेळोवेळी दक्षता व पाठपुरावा करत राहणे हि आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची ओळखच आहे. गत काळात सर्वप्रथम शहरातील रस्ते विकासासाठी ४ कोटी तद्नंतर पुन्हा रस्ते विकासासाठी २.५ कोटी, पुरा ते रंगारी दरम्यान पुलासाठी ३ कोटी, अंजनी नदीच्या काठावरील कासोदा दरवाज्यापासुन ते महादेव मंदीरापर्यंत रस्ता विकासासाठी ५ कोटी
असा शहराचा सर्वांगिण विकास सुरू असतांनाच आज नव्याने शहरातील नगरपरिषद हद्दीतील अत्याधुनिक सोईसुविधा युक्त सांस्कृतिक भवन इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी व काॕलनी भागातील ओपनस्पेस मध्ये विविध ठिकाणे उद्यान विकसित करणे व सुशोभिकरणासाठी ५ कोटी असा एकुण १० कोटी रूपयांचा निधीस शासनाच्या नगरविकासमंत्रालयातर्फे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत मंजुरी देण्यात आली. आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी शहराचा सर्वांगिण विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच निधी प्राप्त झालेला आहे.
सांस्कृतिक भवनामुळे कला, सांस्कृतिक, शिक्षण या क्षेत्रातील लहान्यांपासुन थोरल्यांना एक हक्काचे व्यासपिठ उपलब्ध झालेले आहे. तसेच शहरात लहान्यांपासुन तर वयोवृध्दापर्यंत पहाटेच्या व सायंकाळच्या वेळी शरीराच्या व्यायाम, पायी फिरणेसाठी तसेच बालकांना करमणूकीसाठी शहराच्या विविध भागांत उद्यानांची फार आवश्यकता होती. त्यामुळे आमदार मा.आबासाहेबांच्या दुरदृष्टीने ही दोनही कामे शहराचा सर्वांगिण विकासात अधिक भर करणारी आहेत. यामुळे शहरवासियांच्या मुलभुत सुविधा परिपुर्ण होणेसाठी मोठी मदत होणार आहे.
या कामांच्या मंजुरीमुळे शहरवासियांमध्ये अतिउत्साहाचे वातावरण असुन शहरवासियांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे आभार मानले आहेत. तसेच मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठी वेळोवेळी योग्य ते सहकार्य मिळत असल्याने आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब व नगरविकासमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानले आहेत.





