
झुंजार । प्रतिनिधी – संतोष कदम.
गंगापूर : वंचित बहुजन आघाडीच्या आज जोरदार निदर्शने करुन तहसीलदार गंगापूर यांना निवेदन दिले सादर करण्यात आले यात म्हटले आहे की २०२१ मध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर बिल २०२१ हे शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्र विधानमंडळाच्या पटलावर ठेवले आहे
अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी आणलेले मोहम्मद पैगंबर बील जशास तसे पास करून त्यांचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे सदरील बील पास करून कायद्यात रुपांतर झाले तर मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दलच काय कोणत्याही समाजातील देवदेवतांचा अपमान कारक उल्लेख करण्याची हिंमत कोणी करणार नाही तरी आपण येणार्या अधिवेशनात या बिलाचे कायद्यात रूपांतर करावे जेणेकरून भविष्यात असा प्रकार घडणार नाही हि वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे
त्याचप्रमाणे मागील आठवड्यात भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपमान कारक वक्तव्य केले त्यामुळे जगभरात देशांची मान शरमेने खाली गेली त्या घटनेचा वंचित बहुजन आघाडी जाहीर निषेध व्यक्त करून नुपूर शर्मा यांना महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात यावी अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने आंदोलन करुन करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार अविनाश अंकुश यांनी प्रशासनाच्या वतीने निवेदन स्विकारले
यावेळी रुपचंद गाडेकर जिल्हा उपाध्यक्ष, शेख युनुस रज्जाक पटेल तालुकाध्यक्ष,बाबासाहेब दुशिग मधुकर त्रिभुवन,युवा तालुकाध्यक्ष नितीन शेजवळ,बापू खाजेकर,समीर शेख ,रतन खरात ,विक्रम तुपे, विठ्ठल पाईकरव,राजू खाडे ,हुसेन शेख,किरण किर्तीशाही,महेश नरवडे, दत्ता गायकवाड,असिफ शहा, सदईबाबा पठाण,किशोर बनकर, दिलीप आरक, रामेश्वर दाणे,राजु भाई शेख,हारुण शेख, नवाझ भाई अरुण सातुरे, यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





