
झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
वालचंदनगर : ( ता. इंदापूर)दिनांक 15 जून 2022 रोजी संपूर्ण राज्यातील शाळा सुरू झाल्या. शैक्षणिक सत्रातील पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या व टाळ्यांच्या गजरात जल्लोषात स्वागत झाले. नवीन विद्यार्थ्यांना चॉकलेट, फुगे व गुलाब पुष्प विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत कुंभार व उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम यांच्या हस्ते देण्यात आले.
आज उपस्थित इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. विद्यार्थी स्वागत व पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रमात स्कूल बस सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या मनोगतातून नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी साठी गुरुकुल शिक्षण हा उपक्रम जाहीर केला. गुरुकुल शिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, स्पोकन इंग्लिश यासाठी अतिरिक्त वेळेत विशेष मार्गदर्शन होईल याची ग्वाही दिली.
या कार्यक्रम प्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष अमोल गेंगजे यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले व नियोजन शिवप्रसाद कुलकर्णी, विजयसिंह पाटील, सुरज मोरे यांनी केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे व माणिक पिसे, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.





