
चंद्रपूर : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये वाढ होत आहे अश्यातच चंद्रपुरात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. कार आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दोघा जीवलग मैत्रिणींचा दुर्दैवी अंत झाला. पदवीच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या या विद्यार्थ्यीनी परीक्षेसाठी निघाल्या होत्या. या दोघीही जणी एकत्र स्कूटीवरुन निघाल्या होत्या. परीक्षेला जाताना त्यांच्या स्कूटीला एका भरधाव कारने चिरडलं. या अपघातामध्ये दोघींनाही गंभीर दुखापत होऊन दोघींचाही जागीच जीव गेलाय. डिग्रीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या तरुणींच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. हा अपघात प्रचंड भीषण होता. त्यात या दोघा तरुणींचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झालाय.
जीवलग मैत्रिणींचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा-गडचांदूर मार्गावर हा अपघात घडला. गडचांदूर जवळील निंबाळा येथे राहणाऱ्या दोघी जीवलग मैत्रिणी परीक्षेसाठी निघाल्या होत्या. शगुणा झाडे आणि प्रांजली मेश्राम अशी दोघा मैत्रिणींची नावं आहेत. त्या राजुरा येथील महाविद्यालायत शिक होत्या. परीक्षेला जाण्यासाठी त्या एकत्र निघालेल्या.
कारने चिरडलं
परीक्षेला जात असताना त्यांच्या स्कूटीचा अपघात झाला. एका कारनं त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की त्यात दोघींच्याही डोक्याला जबर मार बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आर्वी खामोना दरम्यान, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कारने या दुचाकीला धडक दिली आणि हा अपघात झाला.





