
धरणगाव प्रतिनिधी
धरणगाव :- पिंप्री खु येथील आदर्श माध्यमिक विद्यालय चा निकाल शंभर टक्के लागला असुन शाळेच्या पहिल्याच बॅचने यशाचा झेंडा रोवल्याने परिसरात आनंद व्यक्त होत आहे. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कोविड 19 मुळे शिक्षण प्रवाहात बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते . परंतु महाराष्ट्र भरात विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांनी यश प्राप्त होत विजयाचा आनंद साजरा केला जात आहे.
आदर्श माध्यमिक विद्यालय पिंप्री येथुन महेश्वरी रवींद्र बडगुजर हिने 86. 00 टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर विवेक 84. 40 बडगुजर याने तर असमा शेख 80. 60 तृतीय क्रमांक वर यशस्वी झाले.
विद्यार्थ्यांचे कौतुक..!
शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना शाळेत आमंत्रित करून अभिनंदन करण्यात आले. या वेळी संस्था अध्यक्ष श्री मधुकर रामजी चौधरी , संस्थेचे सचिव श्री विनोद चौधरी, आदर्श माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते. तसेच आदर्श प्राथमिक शाळेच्या वतीने देखील विद्यार्थी व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.





