कै..आण्णासाहेब ग्रामविकास मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय भालगाव बु! ता.एरंडोल शाळेचा निकाल 93.75.

Spread the love

एरंडोल :- कै.आण्णासाहेब ग्रामविकास मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय भालगाव बु! ता.एरंडोल या शाळेचा मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून वार्षिक निकाल 93.75 इतका लागला आहे.

विद्यालयातील विद्यार्थी समाधान प्रविण पाटील या विद्यार्थ्यास 500 पैकी441 गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला त्यास 88.20 शेकडा गुण प्राप्त झाले.. तसेच द्वितीय क्रमांक पाटील राजश्री गोविंदा पाटील या विद्यार्थींनीस 500 पैकी 429गुण मिळाले आणि शेकडा गुण 85.80 प्राप्त झाले.. तसेच विद्यालयातून तृतीय क्रमांक रोशनी ज्ञानेश्वर मराठे यास 500 पैकी425 गुण प्राप्त झाले असून शेकडा गुण 85.00 मिळाले …

मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षा साठी आमच्या विद्यालयातून 32विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 30विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष आदरणीय डाँ.दिनकरराव पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे

टीम झुंजार