सकाळी की रात्री? आंघोळ करण्याची योग्य वेळ कोणती, एक्सपर्टने सांगितला आयुर्वेदातील नियम

Spread the love

Bathing Tips : – आयुर्वेदात आंघोळ करण्याची योग्य वेळ सकाळची सांगण्यात आली आहे आणि याचं सर्वात मोठं कारण हे आहे की, तुम्हाला अनेक रोगांपासून वाचण्यास मदत मिळते. सोबतच तुम्ही दिवसभर ताजेतवाणे राहतात.

Bathing Tips : रोज आंघोळ करणं चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. आंघोळ केल्याने अनेक रोगांपासून बचाव होतो, सोबतच तुम्हाला फ्रेशही वाटतं. तसे तर जास्तीत जास्त लोक सकाळी आंघोळ करतात. पण पण काही लोक असेही आहेत जे रात्री झोपण्यापूर्वीही, ऑफिसमधून आल्यावर किंवा सकाळी नाश्ता केल्यावर आंघोळ करतात. जर तुम्हीही असंच करत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात.

आयुर्वेदात आंघोळ करण्याची योग्य वेळ सकाळची सांगण्यात आली आहे आणि याचं सर्वात मोठं कारण हे आहे की, तुम्हाला अनेक रोगांपासून वाचण्यास मदत मिळते. सोबतच तुम्ही दिवसभर ताजेतवाणे राहतात. सकाळी आंघोळ करण्याचे अनेक लाभही आहेत.

नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल इन्फॉर्मेशमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, आंघोळ केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारतं. रोज आंघोळ करणाऱ्या लोकांमध्ये वेदना, तणाव आणि डिप्रेशनसारखी लक्षणं अनियमित रूपाने आंघोळ करणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी असतात.

आयुर्वेदिक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी आंघोळीच्या वेळासंबंधी माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं की, आंघोळ आयुर्वेदात थेरेपेटिक अॅक्टिविटी आहे जी तन, मन आणि आत्मा फ्रेश ठेवण्याचं काम करते.

टीम झुंजार