सोने-चांदी दरात घसरण, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

Spread the love

मुंबई :- गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात स्थिरता नाही. शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस सोने चांदीच्या भावात दरवाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या आणि चांदीच्या भाव पुन्हा घसरले. त्यामुळे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी पुन्हा सोन्यात घसरण झाल्याने आज सोने खरेदीवर जोर दिसून येईल.

आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,980 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 610 रूपये आहे

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई – 52,090 रुपये

दिल्ली – 52,010 रुपये

हैदराबाद – 51,980 रुपये

कोलकत्ता – 52,010 रुपये

लखनऊ – 52,160 रुपये

मुंबई – 51,980 रुपये

नागपूर- 52,030 रुपये

पूणे – 52,030 रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी –

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ ( इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)

हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडईस (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अ कार्य करते

टीम झुंजार