धम्मगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार येथे बहुजन फाउंडेशन च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
लासुर्णे : (ता.इंदापूर )
धम्म गुरु डाॅ.बाबासाहेब
आंबेडकर बुध्द विहार येथे बहुजन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य लासुर्णे या इंदापुर यांचे वतीने नागलोक नऊदारे वस्तीवरील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यामध्ये इयत्ता१ली ते चौथी आणि ५वी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना फुलस्केप प्रत्येकी सहा सहा वह्या पेन पेन्सिल इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते कवी लेखक विचारवंत ॲड. संजय चंदनशिवे होते प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रीपती दादा चव्हाण, डॉ.तायाजी लोंढे सर, महाराष्ट्र बॅंकेचे अधिकारी श्री.नरळे साहेब,सोमनाथ लोंढे माजी ग्रामपंचायत सदस्य लासुर्णे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश मिसाळ साहेब सौ.मिसाळ वहिनी उपस्थितीत होते.यावेळी उपस्थितीतांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.

श्रीपती चव्हाण म्हणाले, बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा दिलेला मुलमंत्र आपण पुढे घेऊन जावु.त्यामुळे गावोगावी असे उपक्रम राबविले पाहिजेत.असे उपक्रम राबवण्याचा प्रत्येक शिक्षित वर्गाने घेतला पाहिजे असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी डॉ.तायाजी लोंढे म्हणाले, बाबासाहेब म्हणतात,शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.म्हणुन प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची काळजी घ्यावी.असे ते म्हणाले.

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा लासुर्णेचे अधिकारी श्री.नरळेसाहेब म्हणाले,आमच्या काळात कोणत्याही शासकीय सुविधा अथवा आमची शिकण्याची ऐपत नसतानाही आम्ही शिक्षण घेऊन अधिकारी झालो.हाच धागा पकडून बहुजन समाजाने शिक्षण घ्यावे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना ॲड.संजय चंदनशिवे म्हणाले,पे बॅक टु सोसायटी ही बाबासाहेबांनी दिलेली संकल्पना बहुजन फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश मिसाळ आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी राबविलेली योजना खरोखरच कौतुकास्पद आहे . योगेश मिसाळ यांचा स्तुत्य उपक्रम सर्वांनी अंगीकारला तर समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण अधिकाधिक वाढुन समाजामध्ये अधिक विद्यार्थी सनदी अधिकारी बनतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात बौध्दाचार्य आनंद फडतरे यांनी बुद्धवंदना त्रिसरण पंचशिल घेऊन केली. कार्यक्रमाचे खुमासदार सुत्रसंचलन संतोष कांबळे यांनी केले.या कार्यक्रमास प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यामध्ये आबा बनसोडे,किर्ती तोरणे,बी.एम.कांबळेसर,यांचा समावेश होता.तसेच नागलोक वस्तीवरील असंख्य लोक उपस्थितीत होते.धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

टीम झुंजार