
झुंजार । प्रतिनिधी
वावडदा :- १९ जून हा दिवस संपूर्ण जगात फादर्स डे अर्थात जागतिक पितृ दिवस म्हणून साजरा केला गेला. यानिमित्ताने वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते व खान्देश मराठा कुणबी वधूवर परिचय गृपचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून जागतिक पितृ दिवस हा एक नाविन्यपूर्ण साजरा केला.
यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे काका गोकुळ फकीरा पाटील व ग्रामस्त उपस्थित होते.पितृ दिनानिमित्त राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सुमित पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. झुंजार टीम परिवारातर्फे त्याच्या या कार्याबद्दल अभिनंदन केले. सुमित पाटील हे नेहमी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहून सामाजिक कार्य करीत असतात





