चोपडा रोटरीतर्फे भार्डू व अनवर्दे जि. प. शाळांना हॅन्ड वॉश स्टेशन वितरित…

Spread the love

अडावद ता चोपडा प्रतिनिधी (डाॅ. सतीश भदाणे )
शहरी भागातील शाळांप्रमाणे ग्रामीण भागातील शाळांचेही रूप बदलायला सुरुवात झाली आहे .विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसाठी शासन , शाळा व्यवस्थापन समिती प्रयत्नशील आहेत. शैक्षणिक व सामाजिक कार्यात रोटरी क्लबचा नेहमीच मदतीचा हात असतो .त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लबतर्फे तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा भार्डू व अनवर्दे बुधगाव या दोन्ही शाळांना हॅन्ड वॉश स्टेशन वितरित करण्यात आले.

शाळेत हात धुण्याची व्यवस्था नसल्याने हात धुतले जात नाहीत. जंतू हातावरच राहतात .हे जंतू शरीरात जातात .त्यामुळे विद्यार्थ्यांना आजार होतो. परिणामी विद्यार्थी आजारी पडतात .या सर्व बाबींचा विचार करून रोटरी क्लब ऑफ चोपडा या सेवाभावी संस्थेने हॅन्ड वॉश स्टेशन उपलब्ध करून दिले आहेत.

हॅन्ड वॉश स्टेशन वितरणाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले , सचिव प्रवीण मिस्त्री , एनकलेव चेअर एम डब्ल्यू पाटील, अविनाश पाटील , जिल्हा परिषद शाळा भार्डू येथील उपक्रमशील शिक्षिका रेखा पाटील ,शैला कोळी ( प्र. मुख्याध्यापिका ) , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष शेखर पाटील ,

साहेबराव पाटील , मुकेश पाटील ,योगेश पाटील , प्रफुल्ल पाटील , राहुल पाटील ( आरोग्य अधिकारी) , गजानन पाटील ( ग्रामसेवक) , सुनंदा ठाकूर ( अंगणवाडी मदतनीस ) तसेच जिल्हा परिषद शाळा अनवर्दे बुधगाव येथे वासुदेव नन्नवरे ( मुख्याध्यापक ) , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास शिरसाठ ,उपाध्यक्ष सचिन साळुंखे , लक्ष्मण शिरसाठ , गजानन शिरसाठ, यांसह शिक्षक पांडुरंग महाजन, लक्ष्मीकांत पाटील ,श्रीमती सुचिता सैंदाणे ,योगेश पाटील ,गणेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते…

टीम झुंजार