धक्कादायक ; किरकोळ कारणावरून पतीने लाकडाच्या दांड्याने केला पत्नीचा खून, पतीस अटक.

Spread the love
संशयित बाळू बारेला

प्रतिनिधी । एरंडोल


एरंडोल :- किरकोळ वाद झाल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने लाकडाच्या दांड्याने मारहाण केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना जवखेडा तालुका एरंडोल येथे घडली पोलिसांनी महिलेच्या पतीस अटक केली आहे.


या बाबत माहिती अशी की बाळू भाया बारेला हे पत्नी भुरकी बाई बारेला व सहा मुलांसह जेवखेडा येथे एका शेतात राहून शेतीचे कामे करून परिवाराच्या उदरनिर्वाह करीत होते. 2 जून रोजी महिलेचा भाऊ सुरसिंग फुलसिंग बारेला यास सकाळी सात वाजेच्या सुमारास कैलास बारेला यांनी मोबाईल वरून तुमची बहीण भुरकीबाई बारेला वय 30 वर्षे हिचा मृत्यू झाला असून मेव्हणे बाळू बारेला हे मृतदेह घेऊन मूळगाव झापडीमल्ली ता. वरला जि बडवाणी येथे घेऊन जात आहे असल्याचे सांगितल्याने बहिण मृत झाल्याचे समजताच तिची आई व भाऊ हे झापडीमल्ली येथे गेले. त्या ठिकाणी भुरकीबाई बारेला हिच्या मृतदेह गुंड्या सुरसिंग बारेला याच्या घरात ठेवण्यात आला होता. भाऊ सुरसिंग बारेला यांनी मृतदेह कोणी आणला या बाबत माहिती विचारली असता मेव्हणा बाळू बारेला व त्यांच्या शेठणे गाडीतुन मृतदेह आणला असून बाळू बारेला हा मृतदेह टाकून पळून गेला तर त्याच्या शेठ गाडी घेऊन निघून गेल्याचे सांगितले.

सायंकाळी कैलास बारेला याने सुरसिंग बारेला यांना सांगितले की रात्री दहा वाजेच्या सुमारास बाळू बारेला हा पत्नी भूरकीबाई बारेला हिस लाकडाच्या दांड्याने मारहाण करीत होते त्यावेळी नूचडीया बारेला हे समजावण्यासाठी गेले असता त्यास देखील मारण्याच्या प्रयत्न केला असता तो पळून गेला याबाबत भुरकीबाईचा भाऊ सुरसिंग बारेला यांनी वरला जिल्हा बडवानी येथे तक्रार दाखल केल्यानंतर एरंडोल पोलीस स्थानकात संशयित बाळू बारेला यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहिरे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहे.


फोटो:-

टीम झुंजार