
मेष:-
धार्मिक कामात मदत कराल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. घरगुती कामानिमित्त प्रवास घडेल. सामुदायिक गोष्टींमध्ये अडकू नका. सहकार्यांशी सलोख्याने वागावे.
वृषभ:-
किरकोळ व्यावसायिक अडचणी दूर होतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मुलांचा खोडकरपणा वाढीस लागेल. जमिनीच्या व्यवहारातून लाभ मिळवाल. रेस, जुगारापासून दूर राहावे.
मिथुन:-
गरज नसलेल्या विचारांना थारा देऊ नका. शांत व तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. बौद्धिक हटवादीपणा दाखवाल. आभ्यासू दृष्टीकोन ठेवाल.
कर्क:-
कलात्मक आनंद शोधावा. विषयाच्या मुळाशी जाऊन पहावे. तुमच्या विरोधात काही व्यक्ती वागू शकतात. जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
सिंह:-
लहान मुलांच्यात वावराल. जवळचे मित्र भेटतील. अधिकारी लोकांच्या ओळखी होतील. मनाचा विचार महत्त्वाचा ठरेल. रेस, जुगार यांपासून दूर राहावे.
कन्या:-
अपेक्षित ध्येयासाठी थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. नातेवाईकांची मदत घेता येईल. थट्टेखोर स्वभावामुळे लोकप्रिय व्हाल. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल. कमिशनच्या कामातून लाभ मिळवाल.
तूळ:-
प्रवासात चोरांपासून सावध राहावे. भावंडांशी गैरसमजाचे प्रसंग येऊ शकतात. चैनीच्या वस्तूंवर खर्च कराल. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा वाढतील. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
वृश्चिक:-
पराचा कावळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कौटुंबिक वातावरण कलुषित होऊ शकते. रागाला आवर घालावी लागेल. जोडीदाराचा हट्ट पुरवाल. संयम बाळगावा लागेल.
धनू:-
आज प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. मनात विचारांचा गुंता वाढवू नका. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. कौटुंबिक वातावरण तप्त राहू शकते. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
मकर:-
दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. मनातील संभ्रम टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रमंडळी जमवून वेळ आनंदात घालवा. प्रेमसंबंधाची व्यापकता वाढेल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.
कुंभ:-
शारीरिक ऊर्जेची बचत करावी लागेल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. पत्नीशी मतभेद होण्याची शक्यता. मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.
मीन:-
तुमच्यातील उत्साह वाढीस लागेल. गोष्टी व्यवस्थित समजून मग वागावे. कौटुंबिक अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. कामाच्या ठिकाणी चोख राहावे लागेल. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत.…
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर





