धरणगावात पालकमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

Spread the love
गुलाबराव पाटलांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करताना संतोष सोनवणे

धरणगाव :- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सालदाराच्या मुलाला आमदार केले, आमदाराला मंत्री केले, कॅबिनेट मंत्री पद दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असून ज्यांना शिवसेनेने त्यांना मोठं केलं अशी संतप्त प्रतिक्रिया धरणगावच्या शिवसैनिकांनी दिली आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी भर चौकात या गुलाबराव पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील केले आहे.

गुलाबराव पाटलांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीही कमी पडू दिले नाही, तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला आहे. गुलाबराव पाटील संकटात पक्षप्रमुखांना सोडून चालले गेले आहेत. त्यांच्या कृतीमुळे धरणगाव तालुक्यातील शिवसैनिक संतप्त आणि नाराज झाले आहे. अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

या वेळी गुलाबराव पाटील यांच्या कृत्याच निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली, तसेच शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे शिवसैनिक संतोष नारायण सोनवणे यांनी सांगितले. या वेळी शरद शिरसाठ व काही शिवसैनि उपस्थित होते.

टीम झुंजार