
कोल्हापूर प्रतिनिधी-
तुकाराम पाटील–
कोल्हापूर :- देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथील क्रीडाविभागएन.सी.सी.विभाग, एन.एस. एस.(राष्ट्रीय सेवा योजना) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आठवा योगदिन साजरा झाला. यामध्ये क्रीडा विभागाचे खेळाडू , एन.सी.सी. कॅडेट , एन.एस.एस. स्वयंसेवक ,प्र.प्राचार्य डॉ. प्रशांत शाह, उपप्राचार्य डॉ. एम.एम .बागवान, उपप्राचार्य एस.जी. कागवाडे, पर्यवेक्षक अशोक पवार, पर्यवेक्षिका एस.पी. जाधव,क्रीडा विभाग प्रमुख प्रा .रविंद्र चव्हाण, मेजर डॉ. अशोक डोनर , प्रा. निरंजन जाधव यांसह सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण 220 लोक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
सकाळी 6वाजून 45 मिनिटांनी योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली व घड्याळी एक तास प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.एनसीसी कॅडेट तेजश्री पाटील व निरंजन पाटील यांनी योगासनाची उत्कृष्टपणे प्रात्यक्षिके सादर केली. त्यांच्या प्रात्यक्षिकांचे अनुकरण करून सहभागी लोकांनी उत्कृष्टपणे सर्व योगासने केली.
दरम्यान गेल्या अकरा दिवसांपासून महाविद्यालयातील एन सी सी आणि क्रीडाविभाग यांच्यावतीने योगासनाचे प्रशिक्षण शिबिर सुरू होते. या शिबिरात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व योगासनाचे धडे प्राप्त केले होते. त्यांना मार्गदर्शक म्हणून योगगुरू श्री अनिल श्रीखंडे सर यांनी मार्गदर्शन केले.





