पावसाच्या दमदार हजेरी नंतर तालुक्यात पेरणीची लगबग सुरू

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- मागील दोन-तीन दिवसात तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजाची पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे. दमदार पावसाच्या हजेरी नंतर शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून मोठ्या संकटाना तोंड देत जमवाजमव करून ठेवलेली खते व बियाणे पावसाच्या आगमनानंतर मोठ्या आनंदाने पेरणी करत आहे.

तालुक्यातील बहुतेक लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून शेतीवर आधारित व्यवसाय व्यवसाय करीत असतात यामध्ये पशु पालन काही प्रमाणात कुक्कुटपालन यासारखे शेतीला जोडधंदा म्हणून करीत असतात तालुक्यात जवळपास 70 टक्के शेती जिरायती शेती आहे.या शेतीमध्ये शक्यतो एकच पीक घेतले जाते त्यामध्ये सोयाबीन तूर उडीद मूग कापुस या प्रमुख पिकसह काही गहु हरभरा, भुईमूग,कांदा,हळद,ऊस यासारखी पिके तालुक्यात घेतली जातात.पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाल्यानंतर शेतकरी वर्ग मोठ्या आशेने पावसाची वाट पाहत असतो.


शेती ही पावसाच्या भरवशावर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी दरवर्षी न खचता मोठ्या उमेदीने व आशेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नवीन स्वने घेऊन पेरणी करत आहे. इतक्या सर्व संकटांना तोंड देत शेतकरी दरवर्षी निसर्गाच्या कोणतीही शाश्वती नसताना,भावाची कोणतीच माहिती नसताना सुद्धा मोठ्या जोमाने आपल्या रक्ताचे पाणी करून शेतामध्ये काम करत असतो, त्याच्या मालाला योग्य मोबदला मिळावा हीच अपेक्षा ठेवून तो दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आसमानी सुलतानी संकटांना तोंड देत शेतामध्ये काबाडकष्ट करून सुखाने जगण्याचा प्रयत्न करतो.

टीम झुंजार