
एरंडोल / प्रतीनिधि
एरंडोल : – श्रीक्षेत्र पद्मालय येथील पडक्या बसस्थानकाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने भातखेडे (ता.एरंडोल) येथील बावीस वर्षीय युवकास अटक करून त्याचे कडून सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे दोन कट्टे जप्त केले.श्रीक्षेत्र पदामालाय परिसरात गावठ कट्ट्यासह युवक सापडल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी,की जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देविदास देवढे याना पद्मालय येथे एक युवक गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली.उपनिरीक्षक अमोल देवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी भगवान तुकाराम पाटील,सुनील दामोदरे,अशरफ शेख,नंदलाल पाटील,राहुल बैसाणे,ईश्वर पाटील याना याबाबत माहिती दिली.शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पद्मालय परिसरात गेले.
पद्मालय येथील शासकीय विश्राम गृहाच्या बाजूला असलेल्या अंधारात वाहन लाऊन कर्मचा-यांनी संशयिताचा शोध घेण्यास सुरुवात केली.रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पद्मालय येथील जुन्या बसस्थानकाजवळ अंधारात एक युवक असल्याचे दिसताच गुन्हे शाकेच्या कर्मचा-यांनी त्यास ताब्यात घेतले.त्याची विचारपूस केली असता त्याने स्वत;चे नाव चेतन गोविंदा पाटील (भदाणे) रा.भातखेडे ता.एरंडोल असल्याचे सांगितले.त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेस सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे दोन गावठ कट्टे आढळून आले.

पोलिसांनी त्यास तत्काळ ताब्यात घेवून एरंडोल पोलीस स्थानकात आणले.याबाबत भगवान तुकाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून चेतन पाटील याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत.दरम्यान श्रीक्षेत्र पदामालाय येथे देशभरातून दररोज भाविक मोठ्या संख्येने येत असतात मात्र त्याच ठिकाणी गावठी कट्ट्यासह युवक सापडल्यामुळे भाविकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.पद्मालय परिसरात घनदाट जंगल असून नैसर्गिक वातावारानाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणावर येत असतात.
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.





