
झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल :- आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी गटसाधन केंद्र एरंडोल येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली याप्रसंगी उत्राण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सुनिल महाजन सर यांनी शाहु महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला
या कार्यक्रमाप्रसंगी बीआरसी मधील कुबडे सर युवराज पाटील अभिमन पाटील ,चंद्रकांत पाटील , बडगुजर सर , राकेश पाटील सर , जगदीश पाटील सर , निवृत प्राध्यापक आर .एस. पाटील , तापीराम पाटील , निकम सर , हेमंत सोनवणे , प्रमोद सोनवणे आदी शिक्षक मंडळी उपास्थित होते .
प्रास्ताविक आर एस पाटील सर यांनी केले . प्रास्ताविकात प्रा . आर एस पाटील सरांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती दिली .राजर्षी शाहू महाराज यांनी या देशामध्ये सर्वप्रथम कोल्हापूर संस्थानात आरक्षण सुरू केले म्हणून राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणतात तसेच त्यांनी शिक्षण हे जीवनाच्या विकासाचे माध्यम आहे म्हणुन त्यांनी गोरगरीब ,दीन दुबळे, दलित ,आदिवासी यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली तसेच ज्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नव्हते अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिष्यवृत्ती व ज्यांना राहण्याची व्यवस्था नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची उभारणी केली
तसेच कुस्तीसारख्या मातीतल्या खेळायला त्यांनी राजाश्रय दिला तसेच शेतकरी व गोरगरीबांचे शेती हे महत्त्वाचे साधन असल्यामुळे त्यांनी सगळ्यात आधी या महाराष्ट्रामध्ये राधानगरी येथे धरण बांधले अशाप्रकारे राजा असलेले परंतु सर्व सामान्यांना आपलेसे वाटणारे लोक राजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करत असतो कारण त्यांनी या सगळ्या गोष्टी करत असताना सर्व जाती व धर्मामध्ये एकोपा निर्माण व्हावा यासाठी अनेक सामाजिक बदल केले सुत्रसंचालन हेमंत सोनवणे तर आभार प्रदर्शन अभिमन पाटील यांनी केले .





