
मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच आवळुन निघाले आहे अश्यातच कालच जोरदार टीका केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.
काल खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली होती. अगदी कुणीही नसलेल्यांना शिवसेनेने आमदारकी आणि मंत्रीपदे दिल्याचे अनेक उदाहरणे देत त्यांनी या सर्वांवर टीकास्त्र सोडले. यात त्यांनी एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे यांच्यासारख्या अतिशय सर्वसामान्य स्थितीतील शिवसैनिकांना खूप मोठी पदे दिल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. तर अदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना उध्दवजींनी आधीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट केला. त्यांनी देखील बंडखोरांवर टीका केली होती.
या पार्श्वभूमिवर, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक ट्रिट केले आहे. यात त्यांनी गुलाबराव पाटील यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला आहे. यात ते निष्ठेबाबत बोलतांना दिसून येत आहे. याला कॅप्शन देतांना राऊत यांनी अतिशय खोचकपणे टिकास्त्र सोडले आहे. यामुळे लागोपाठ दोन दिवस त्यांनी गुलाबराव पाटलांनाच टार्गेट केल्याचे दिसून आले आहे.
खाली पहा : संजय राऊत यांनी केलेले द्विट!
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर





