एरंडोल :- गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली असून युवकास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथील संशयीत रहिवासी चेतन गोविंदा पाटील (वय २२) या युवकास तालुक्यातील पद्मालय मंदिराच्या रस्त्या जवळ असलेल्या पडक्या बस स्टॉप जवळ दि. २५ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास बेकायदेशीर रित्या २ गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी शस्त्र अधिनियम १९५९ या कायद्या अंतर्गत संशयितावर कार्यवाही करत अटक केली.
त्यांनतर, संशयी आरोपीस दि. २६ रोजी एरंडोल न्यायालयात हजर केले असता, मे. न्यायालयाने आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान सरकार पक्षा तर्फे ॲड. डी बी वळवी तर आरोपीता तर्फे ॲड. अजिंक्य ए काळे व ॲड. आकाश एन. महाजन हे कामकाज पहात आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






