गळफास घेऊन वझर आघाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्यातील वझर आघाव या गावातील गजानन धोंडीबा मोरे वय 40 वर्ष या शेतकऱ्याने राहत्या घरात लोखंडी पाईप ला गळफास घेऊन 28 जून दुपारी 12 वाजता आत्महत्या केली हे उघडकीस आले.

घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे 3 मुली,1 मुलगा, पत्नी अशा परिवाराचे उदरनिर्वाह कसे करायचे त्यातच वाढणारे बँकेचे कर्ज यावर्षी पेरणीसाठी पैसे नाहीत पैसे आणायचे कुठून अशा विवंचनेत पत्नी माहेरी असताना गजानन मोरे यांनी आत्महत्या केली,या घटनेची माहिती मिळताच बीट जमादार गजानन धोंडगे व रवींद्र मोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

याबाबत मृतकांची भाऊ पंढरी धोंडीबा मोरे यांच्या फिर्यादीनुसार आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार गजानन धोंडगे व रविंद्र बोरे करीत आहेत.

टीम झुंजार