नशिराबाद येथे हिंदुत्व युतीचे सरकार स्थापनेच्या फटाके फोडून आनंदोत्सव साजरा-

Spread the love

प्रतिनिधी । सुनील महाजन
नशिराबाद :-
गेल्या अडीच वर्षापासून महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते. आज गुरुपुष्यामृतयोगच्या सायंकाळी ७ वाजता महाराष्ट्र राज्याच्या हिंदुत्व युतीचे सरकार स्थापन झाले असून या राज्याचे नूतन मुख्यमंत्री पदी मा. एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली.

महाराष्ट्रात पुन्हा प्रगतशील, भ्रष्टाचार मुक्त सरकार राज्यात पुन्हा एकदा हिंदुत्व युतीचे सरकार स्थापन झाले आहे असून आज दि 30 जून रोजी सायंकाळी ७ : ३० वाजता भारतीय जनता पार्टी नशिराबाद शहर व शिवसेना नशिराबाद शहर तर्फे शिवसेना कार्यालय बस स्थानक जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद्र दादा पाटील भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष प्रदीप बोठरे शिवसेना अध्यक्ष विकास धनगर युवासेना अध्यक्ष चेतन बराटे यांच्या उपस्थितीत फटाके फोडून जल्लोष करत विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी युतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोष करण्यात आला. या विजयोत्सव प्रसंगी चंदू भोळे कैलास नेरकर चंदू पाटील भूषण पाटील योगेश कोलते विश्वनाथ महाजन गोपाळ माळी सचिन महाजन राजेंद्र पाचपाडे सर ललित बाराटे दीपक घासणे मुरारी देशपांडे कीर्ती कांत चोबे कावळे काका पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

आपण हे वाचले का?

टीम झुंजार